जम्मू – काश्मीरच्या सीमेवर एक पाकिस्तानी घुसखोर ठार

0
9

भारतीय लष्कराने जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ एका पाकिस्तानी घुसखोराला ठार केले आहे. यावेळी इतर दोन दहशतवाद्यांना जिवंत पकडले असून, त्यांच्याकडून ड्रग्जचा मोठा साठाही जप्त करण्यात आला. पाकिस्तानने काल रात्री तिन्ही घुसखोरांना भारतीय हद्दीत पाठवले होते. मात्र लष्कराच्या सतर्कतेमुळे घुसखोरीचे सर्व प्रयत्न हाणून पाडले.
पहाटे 2.15 च्या सुमारास तीन दहशतवादी शाहपूर सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न करत होते. नियंत्रण रेषेवर पहारा देणाऱ्या लष्कराच्या जवानांनी या दहशतवाद्यांना सीमेवर प्रवेश करताना पाहिले तेव्हा त्यांनी लगेच गोळीबार केला.