जम्मू-काश्मिरात तीन दहशतवाद्यांचा खात्मा

0
154

जम्मू काश्मीरमधील बारामुल्ला व सोपोर जिल्ह्यात काल सकाळी सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. बारामुल्ला जिल्ह्यात एका गावातील घरात तीन दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा रक्षकांच्या जवानांना मिळाल्यानंतर त्यांनी धडक मोहीम राबवून चढवलेल्या हल्ल्यात एक दहशतवादी ठार झाला. सोपोर जिल्ह्यात ठाक गुंड गावात दहशतवाद्यांबरोबर झडलेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याची माहिती सुरक्षा अधिकार्‍यांनी दिली.