जम्मू-काश्मीरमधील हंदवाडा येथे रविवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याला ठार मारण्यात आले. हंदवाडा येथे एके ठिकाणी तीन दहशतवादी लपून बसल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून हे सर्व सहशतवादी लष्कर ए तोयबा या संघटनेचे असल्याचे वृत्त आहे.
गेल्याच आठवड्यात दक्षिण काश्मीरमधील कुलगाम येथे दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांना लक्ष्य केले होते. दरम्यान, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी भारतात मोठा हल्ला करण्याच्या तयारीत आहेत, असे वृत्त आहे. नगरोटा-जम्मू-पठाणकोट परिसराला लक्ष्य करणार असल्याची माहिती मिळाली होती. गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ’जैश’चे किमान दहा दहशतवादी पाकिस्तानमार्गे भारतात घुसले आहेत. त्या पार्श्वभूमीवर सुरक्षा दलांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

