जमीन घोटाळा : मोहम्मद सुहेल याला पुन्हा अटक

0
9

गोवा पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाने जमीन हडप प्रकरणातील मुख्य संशयित मोहम्मद सुहेल याला पुन्हा अटक केली आहे. गुन्हा शाखेमध्ये संशयित मोहम्मद सुहेल याच्याविरोधात मार्च 2023 मध्ये एक गुन्हा दाखल झाला होता. अन्य एका प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर मोहम्मद सुहेल हा फरार झाला होता. गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक लक्षी आमोणकर यांनी त्याला केपे येथे काल अटक करण्यात यश मिळविले. राज्यातील जमीन घोटाळा प्रकरणामध्ये सुहेल याच्याविरोधात एकूण 13 गुन्हे नोंद आहेत.