जमीन घोटाळा प्रकरणी दोघांना जामीन मंजूर

0
36

गोवा पोलिसांच्या एसआयटीने जमीन घोटाळा प्रकरणात अटक केलेल्या योगेश वझरकर आणि रॉयसन रॉड्रिग्स या दोघांची म्हापसा येथील प्रथम श्रेणी न्यायालयाने जामिनावर काल सुटका केली. आसगाव येथील जमीन हडपल्या प्रकरणी बार्देश मामलेदार कार्यालयातील वाहनचालक योगेश वझरकर याला अटक करून पाच दिवसांची पोलीस कोठडी घेण्यात आली होती, तर आसगाव येथील आणखी एका जमीन हडपल्या प्रकरणी रॉयसन रॉड्रिग्स याला अटक केली होती.