जमीन घोटाळा प्रकरणात 6.82 कोटींची मालमत्ता जप्त

0
17

ईडीने राज्यातील कोट्यवधी रुपयांच्या जमीन घोटाळा प्रकरणामध्ये हणजूण येथील सुमारे 6.82 कोटी रुपयांची मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे.
राज्यातील जमीन घोटाळा प्रकरणातील संशयित आरोपी मोहम्मद सुहैल याच्याशी संबंधित ही मालमत्ता ईडीने तात्पुरती जप्त केली आहे. ईडीकडून मनी लॉन्ड्रिंग कायद्याखाली जमीन हडप प्रकरणात तपास केला जात आहे. संशयित आरोपी मोहम्मद सुहैल याने बनावट कागदपत्रांच्या आधारे ही मालमत्ता हडप केली होती. गोवा पोलिसांच्या एसआयटीने या जमीन हडप प्रकरणामध्ये मोहम्मद सुहैल याच्यासह अंजुमन शेख, नुरी फैजल भाटकार यांच्याविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित सुहैल हा जमीन हडप प्रकरणातील एक सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरोधात जमीन हडप प्रकरणात अनेक गुन्हे नोंद झालेले आहेत.