जनावरांसाठीही हेल्पलाईन, रुग्णवाहिका सेवा : हळर्णकर

0
14

पशुसर्ंवधन खात्याकडून जनावरांसाठी १०८ च्या धर्तीवर हेल्पलाईन आणि चोवीस तास रुग्णवाहिका सेवा सुरू केली जाणार आहे. डिचोली तालुक्यात सुपर स्पेशालिटी इस्पितळ सुरू केले जाणार आहे, अशी माहिती पशुसंवर्धन, मत्स्योद्योग मंत्री नीळकंठ हर्ळणकर यांनी विधानसभेत अनुदानित मागण्यांवरील चर्चेच्या उत्तरात काल दिली. दूध उत्पादनात कामधेनू योजनेमुळे वाढ झाली आहे. दूध उत्पादक शेतकर्‍यांना खात्याच्या पशुवैद्यकीय दवाखान्यातून पशुवैद्यकीय सेवा आणि औषधांचा पुरवठा केला जात आहे, असे हर्ळणकर यांनी मच्छिमारांना सुरक्षा उपकरणे उपलब्ध केली जात असून, त्यांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जात आहे. मच्छिमारांसाठी नियंत्रण कक्ष सुरू केला जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.