26 C
Panjim
Monday, January 18, 2021

जगा ताणमुक्त आयुष्य भाग – १

  • डॉ. स्वाती हे. अणवेकर
    (म्हापसा)

ताण हा कायम नकारात्मकच असतो असे नाही. बरेचदा हा ताण सकारात्मकही असतो ज्यामुळे आपले सादरीकरण उत्तम होते. उदा. एक चांगला खेळाडू खेळत असताना त्याच्या मनावर असणारा थोडा ताण हा त्याला उत्तम खेळण्याची ऊर्जा देतो ज्यामुळे तो आपल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून जिंकू शकतो.

ताणामध्ये आपल्याला भावनिक व शारीरिक पातळीवर ताण जाणवतो किंवा ताण ही आपल्या शरीराची एखादे आव्हान किंवा मागणीच्या बाबतीत असलेली प्रतिक्रिया होय.
थोडक्यात ताण ही एक मानसिक अवस्था आहे जी पुढे जाऊन बर्‍याच मानसिक व शारीरिक व्याधींचे कारण बनू शकते.

ताणाचे प्रकार – १) ऍक्यूट ताण – हा कमी वेळेसाठी येतो व लगेच कमी होतो. एखादी भयावह परिस्थिती हाताळायला उपयोगी. बरेचदा एखादी नवीन व थरारक गोष्ट करताना असा ताण येतो.
उदा.- नवरा-बायकोचे भांडण, कुत्रा मागे धावणे, पहिल्यांदाच रहदारीमध्ये गाडी चालवणे.
२) क्रॉनिक ताण – हा जास्त काळ असतो. काही आठवडे ते काही महिने राहू शकतो. बरेचदा आपल्याला याची एवढी सवय होते की आपल्या लक्षातही येत नाही की आपल्यावर ताण आला आहे.
२अ) भावनिक ताण – प्रेयसी/प्रियकराशी ब्रेकअप.
वातावरणीय ताण- आवडत नसताना गजबजाट, आवाज, गोंगाट असणार्‍या जागेतील घरात राहावे लागणे.
संबंधातील ताण – असफल वैवाहिक जीवन
कामाचा ताण – आपण नोकरी करत असलेल्या ठिकाणी त्रास होणे
३) वेळेचा ताण – यामध्ये आपल्याला असे वाटते की वेळ कमी पडतो आहे. दिवसाचे २४ ताससुद्धा कमी वाटतात.
उदा.- आयटी क्षेत्रात काम करणार्‍या व्यक्तींना प्रोजेक्ट संपवायची अंतिम तारीख दिलेली असते तेव्हा बरेचदा त्यांना असा वेळेचा ताण येतो.
४) काल्पनिक ताण (अँटीसिपेटरी स्ट्रेस) –
यामध्ये आपण एखाद्या स्थितीवर काल्पनिक विचार करून चिंता करतो की पुढे असे झाले तर… तसे झाले तर…??
उदा. एखाद्या व्यक्तीने नवीन व्यवसाय सुरू केला आणि तो असा विचार करू लागला की व्यवसायात तोटा झाला तर…??

५) परिस्थितीजन्य ताण – हा ताण तेव्हा येतो जेव्हा एखादी बिकट परिस्थिती समोर आल्यानंतर आपल्याला योग्य निर्णय घ्यायचा असतो.
उदा. आपल्या परिवारातील जीवलग व्यक्ती ब्रेनडेड होऊन व्हेंटीलेटरवर आहे आणि डॉक्टरांनी व्हेंटीलेटर ठेवायचा की काढायचा हा निर्णय तुम्हाला घ्यायला सांगितला आहे.
६) आकस्मिक आलेला ताण किंवा एन्काउंटर स्ट्रेस –
हा ताण तेव्हा येतो जेव्हा आपल्याला अनेक परिस्थिती किंवा लोकांचा सामना करावा लागतो. उदा. – एखादा दुकानदार संपूर्ण दिवसात अनेक वेगवेगळ्या स्वभावाच्या ग्राहकांना सामोरा जातो.
ताण हा कायम नकारात्मकच असतो असे नाही. बरेचदा हा ताण सकारात्मकही असतो ज्यामुळे आपले सादरीकरण (परफॉर्मन्स) उत्तम होते. उदा. एक चांगला खेळाडू खेळत असताना त्याच्या मनावर असणारा थोडा ताण हा त्याला उत्तम खेळण्याची ऊर्जा देतो ज्यामुळे तो आपल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून जिंकू शकतो. पण त्याच ताणाची तीव्रता वाढली तर मात्र त्याच खेळाडूचा खेळ खराब करू शकतो.

ताणाची कारणे –
१) पैसा – ज्यांच्याकडे भरपूर पैसा असतो त्यांना त्याच्या सुरक्षिततेची चिंता असते आणि ज्यांच्याजवळ पैसा नसतो ते पैसा नसल्याचा ताण घेतात.
२) कार्यालय किंवा नोकरी – बर्‍याच व्यक्तींना कामाच्या ठिकाणी खडूस बॉस, कामाची डेडलाईन किंवा टार्गेट, सहकर्मचारी चांगले नसणे इ.मुळे ताण येऊ शकतो.
३) नातेसंबंध – काही नातेसंबंधांमध्ये ताण असतो. मतभेद हे तेढ निर्माण करतात. उदा. आईवडील व मुलांमधील विचारांमध्ये तफावत आणि ती मानण्यात सामंजस्याचा अभाव, घरामध्ये इतर नातलगांशी होणारे वाद इ.
४) पालकत्व – हल्ली वाढता सोशल मिडियाचा वापर व तंत्रज्ञानाचा प्रभाव यामुळे पालकांवरचा ताण वाढला आहे. पालक म्हणतात मुलं सोशल माध्यम आणि मोबाइलचा अति वापर करतात तर मुलांना वाटते की पालकांना यातले फारसे काही कळत नाही.
तसेच जी मुले विशेष असतात त्यांचे संगोपन करत असतानासुद्धा पालकांना ताणाचा सामना करावा लागतो.
५) दैनंदिन जीवन आणि व्यवसाय – आपल्या दैनंदिन जीवनात आपण अगदी छोट्या छोट्या गोष्टींत ताणाचा अनुभव घेतो. उदा. घरकाम. जर तुमच्या घरकामाच्या बाई न सांगता एक दिवस सुट्टीवर गेली तर विचार करा काय होतं?
बरेचदा काही कामानिमित्त बाहेर पडला असता रहदारीमध्ये आपण तासन्‌तास अडकून पडतो. इ.
तुमचा स्वतःचा व्यवसाय असेल आणि शर्यतीत टिकून रहायचे असेल तर तुम्हाला तुमच्या व्यावसायिक क्षेत्रातलं ज्ञान व नवीन तंत्रज्ञानाबाबतीत अद्ययावत करावे लागते. तसेच व्यवसायात होणारा नफा व तोटा हादेखील ताणाचे एक कारण बनतो.
६) व्यक्तिमत्त्व – बहिर्मुख व्यक्तीला अंतर्मुख व्यक्तीपेक्षा कमी ताण येतो. मग एखादी व्यक्ती स्वतः परफेक्शनिस्ट असेल तर ती स्वतःही एखाद्या कामाचा ताण घेणार आणि तिच्या हाताखाली काम करणार्‍या लोकांचापण ताण वाढवणार.
७) शिक्षण – आजकाल शैक्षणिक क्षेत्रात वाढत असलेल्या स्पर्धेमुळे मुलांचा ताण वाढला आहे. चांगले उच्च शिक्षण घ्यायचे असेल तर तुम्हाला १०-१२वीमध्ये उत्तम टक्केवारी मिळणे गरजेचे आहे. त्यावर तुमचे पुढचे शिक्षण व भवितव्य अवलंबून असते.
तुमच्यावर ताण आलेला आहे, हे कसे ओळखाल?
१. मानसिक ताण – लक्षणे – जगणे कठीण होते, चिंता होणे, एखादी गोष्ट आठवायला त्रास होणे, झोप न येणे.
२. भावनिक ताण – राग, चिडचिड, नैराश्य, मूड नसणे.
३. शारीरिक लक्षणे – उच्चरक्तदाब, वजनामध्ये फरक, वारंवार आजारी पडणे
४. स्वभाव – स्वतःची नीट काळजी न घेणे, तुम्हाला पूर्वी एखादी आवडणारी गोष्ट आता आवडेनाशी होते. तुम्ही एक दिवस दारूसारख्या व्यसनाचा आधार घेता.

STAY CONNECTED

845FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

मागणी मान्य

अखेर मेळावलीवासीयांची मागणी मान्य झाली. त्यांनी स्थानिक आमदार विश्वजित राणे यांना नमवले. विश्वजितनी सरकारला नमवले आणि मेळावलीतून आयआयटी प्रकल्प अन्यत्र हलविण्यास सरकार...

मेळावलीतील आयआयटी प्रकल्पाचे

>> मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषदेत माहिती, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार शेळ-मेळावली येथील आयआयटी प्रकल्पाला स्थानिक लोकांचा असलेला तीव्र विरोध लक्षात...

आजपासून देशात कोरोना लसीकरण

>> गोव्यात ७०० जणांना लस आज शनिवार दि. १६ जानेवारीपासून देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र...

आजपासून देशात कोरोना लसीकरण

>> गोव्यात ७०० जणांना लस आज शनिवार दि. १६ जानेवारीपासून देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र...

पंतप्रधानांनी फोनद्वारे केली श्रीपादभाऊंची विचारपूस

अंकोल्याजवळ अपघातात जखमी झालेले व सध्या गोमेकॉमध्ये उपचार घेणारे केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्याशी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून...

ALSO IN THIS SECTION

मेळावली आंदोलनप्रकरणी तिघांची जामीनावर सुटका

शेळ मेळावली येथील आयआयटी संकुलाच्या जमीन सीमांकनाच्या वेळी झालेल्या हिंसाचारात सहभागी झाल्या प्रकरणी गुन्हा अन्वेषण विभागाने अटक केलेल्या तिघांजणांची काल जामीनावर काल...

आध्यात्मिक पैलूंकडे दुर्लक्ष नको

योगसाधना - ४८९अंतरंग योग - ७४ डॉ. सीताकांत घाणेकर सर्वत्र घडत असलेल्या घटना ऐकल्या- वाचल्या-...

सुवर्णक्षण ः कोव्हॅक्सिन … कोविशिल्ड

मंजुषा पराग केळकर होय, संपूर्ण सुरक्षित, स्वदेशी कंपन्यांनी तयार केलेली लस तयार होऊन आज ती जागतिक मानकांना खरी...

तापमानात घट ः हदयविकाराचा धोका जास्त

डॉ. बिपीनचंद्र भामरे जे धूम्रपान करतात त्यांना हृदयविकाराचा झटकादेखील येऊ शकतो. धूम्रपान केल्याने हृदयाच्या दिशेने ऑक्सिजनचा प्रवाह कमी...

वातरक्त ः एक दारुण आजार

डॉ. मनाली म. पवार(सांतइनेज-पणजी) सर्व प्रकारचे सांधे दुखणे म्हणजे संधिवात नसतो. म्हणून योग्य वैद्याच्या सल्ल्यानेच चिकित्सा- औषधोपचार करावे....