जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा

0
15

जगदीप धनखड यांनी काल भारताचे उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला. त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लिहिलेल्या एका पत्रात आरोग्यासंबंधी कारणे आणि उपचार घेण्याचा सल्ला याचा हवाला देत, संविधानाच्या कलम 67(अ) अंतर्गत त्यांच्या राजीनाम्याची घोषणा केली. दरम्यान, धनखड यांनी या पत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचेही सहकार्य केल्याबद्दल आभार मानले आहेत.

मार्च महिन्यात जगदीप धनखड यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. हृदयाशी संबंधित इन्फेक्शन झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
राष्ट्रपतींना लिहिलेल्या त्यांच्या पत्रात जगदीप धनखड यांनी आरोग्याला प्राथमिकता देत आणि डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करत मी भारताच्या उपराष्ट्रपती पदाचा तात्काळ प्रभावाने राजीनामा देत आहे, असे म्हटले आहे. 2022 मध्ये धनखड यांनी देशाचे 14 वे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतली होती. 6 ऑगस्ट 2022 रोजी उपराष्ट्रपती पदाची निवड झाली होती.