जगदीप धनखड उपराष्ट्रपतीपदी शपथबद्ध

0
15

पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल जगदीप धनखड यांनी काल देशाचे १४ वे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी धनखड यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. दिल्लीतील राष्ट्रपती भवनात हा शपथविधी सोहळा पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह विविध पक्षातील नेते या शपथविधी सोहळ्यात उपस्थित होते.

७ ऑगस्टला पार पडलेल्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार जगदीप धनखड यांनी विरोधी पक्षाच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांचा प्रचंड मतांनी पराभव केला होता. या निवडणुकीत धनखड यांना ५२८ मते मिळाली होती, तर अल्वा यांना केवळ १८२ मतांवर समाधान मानावे लागले होते.