जखमी सून प्रतिमा नाईक चौकशीसाठी ताब्यात

0
273

वास्को दुहेरी खून प्रकरण तपासाला गती
वास्कोतील दुहेरी खून प्रकरणाचा छडा लावण्याच्या दिशेने पोलीस तपासाने गती घेतली असून काल रात्री उशिरा मयत सासू उषा नाईक यांची जखमी सून सौ. प्रतिमा नाईक हिला इस्पितळातून डिस्चार्ज दिल्यानंतर पोलिसांनी तपासासाठी लगेच ताब्यात घेतले आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत. मयत उषा नाईक यांचे दोन्ही मुलगे विदेशात नोकरीला असून काल सिद्धार्थ हा तिचा थोरला मुलगा कॅरेबियन देशातून परतल्याची माहिती मिळताच वास्को येथील लक्षद्वीप अपार्टमेंटमध्ये जाऊन उपअधीक्षक लॉरेन्स डिसौझा, निरीक्षक शैलेश नार्वेकर यांनी फौजफाट्यासह चौकशी केली. दुपारी सव्वाअकरा वाजता पोलिसांनी चौकशी केली.
दुसरा मुलगा प्रवीण आज सकाळी गोव्यात पोचणार असल्याची माहिती नातेवाईकांनी पोलिसांना दिली आहे. तो आल्यानंतर मयत उषा व डॉ. नेहा यांचे मृतदेह निवासस्थानी आणून आज दुपारपर्यंत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. दरम्यान, कालपासून पोलिसांनी अनेकांना पोलीस स्थानकात बोलावून जबान्या घेतल्या. पोलीस निरीक्षक सागर एकोस्कर यांनी सहकार्‍यांसह दुपारी १च्या दरम्यान सौ. प्रतिभा हिच्या सासमोळे येथील वडिलांच्या घरी जान जबानी घेतली. मयत उषा आणि डॉ. नेहा यांचे वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले असून गळा दाबून तसेच तोंड बंद केल्याने गुदमरून त्यांचा मृत्यू झाल्याचे अहवालात म्हटले आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, जखमी सौ. प्रतिमा नाईक व प्रवीण नाईक यांचे सहा महिन्याअगोदर लग्न साध्या पद्धतीनुसार झाले होते. लग्नानंतर सर्वजण एकत्र मायमोळे येथे कामत पॅलेस येथे डुप्लेक्स फ्लॅटमध्ये राहत होते. सर्वजण गुण्यागोविंदाने राहत होते असे शेजार्‍यांनी सांगितले असले तरी मिळालेल्या माहितीनुसार सासू-सुनेचे पटत नव्हते अशी माहिती पुढे आली आहे.
कारण सासू उषा यांचा लग्नाला विरोध होता. परंतु लोकलज्जेस्तव साध्या सोहळ्यात करावे लागले होते. नवरा मुलगा मग काही महिन्यांनी परदेशात नोकरीला गेल्याने फ्लॅटमध्ये जखमी सौ. प्रतिमा, मयत उषा व डॉ. नेह तसेच नेहाची सहा महिन्याची चिरमुडी की. स्नेहल राहत होती. डुप्लेक्स फ्लॅटमध्ये खालच्या मजल्यावर मयत उषा नाईक झोपत होत्या तर वरच्या मजल्यावरील दोन वेगवेगळ्या खोल्यांमध्ये दोन्ही सुना झोपत होत्या.या फ्लॅटमध्ये जाण्याअगोदर एक ग्रील्सचा दरवाजा असून तो रात्री कुलूपबंद असल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर फ्लॅटचा दरवाजा आहे. मग आतमध्ये हल्लेखोर चोरटे कसे काय घुसले याचा उलगडा आज होणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.