चोवीस तासांत 40 कोरोनाबाधित

0
9

>> राज्यात एकूण सक्रिय रुग्णसंख्या 212

राज्यात चोवीस तासांत नवीन 40 कोरोना बाधित आढळून आले आहेत. राज्यातील सक्रिय कोरोना रुग्ण संख्येने दोनशेचा टप्पा पार केला असून ती 212 एवढी झाली आहे. राज्यात नवीन कोरोनाबाधित आढळून येण्याचे प्रमाण 8.9 टक्के एवढे आहे.
चोवीस तासांत 448 स्वॅबच्या नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे. नवीन एकाही बाधिताला इस्पितळात दाखल करावा लागलेला नाही. चोवीस तासांत 18 कोरोनामुक्त झाले आहेत. मागील सहा दिवसांत 192 बाधित आढळून आले आहे. दि. 24 मार्च रोजी या महिन्यातील आत्तापर्यंतचे सर्वाधिक नवीन 55 बाधित आढळले होते.

लसीकरण तूर्त स्थगित
राज्यात कोविड-19 लस उपलब्ध नसल्याने लसीकरणाचे काम तूर्त स्थगित ठेवण्यात आले आहे. येथील आरोग्य विभागाने केंद्रीय आरोग्य विभागाकडे कोविड 19 लस उपलब्ध करण्याची विनंती केलेली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिली. राज्यात कोविड बाधिताची संख्या वाढू लागल्याने नागरिकांकडून कोविड-19 लस घेण्यासाठी आरोग्य विभागाकडे संपर्क साधला जात आहे.