चोवीस तासांत राज्यात २२० कोरोनाबाधित

0
91

राज्यात चोवीस तासांत नवे २२० रुग्ण आढळून आले असून आणखी २ कोरोना रुग्णांचा बळी गेला आहे. राज्यातील सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या १९९५ एवढी झाली आहे. तर, कोरोना बळींची एकूण संख्या ३०८८ एवढी झाली आहे.

चोवीस तासांत राज्यात आणखी २ रुग्णांचा बळी गेला आहे. दोन्ही रुग्णांचा गोमेकॉमध्ये बळी गेला. नवीन रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण ४.८७ टक्के टक्के एवढे आहे.

चोवीस तासांत इस्पितळांतून १७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या १ लाख ६८ हजार ४३० एवढी झाली आहे.

चोवीस तासांत ४५१७ स्वॅबच्या नमुुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यातील २२० नमुने पॉझिटिव्ह आढळून आले.
कुठ्ठाळी येथे सर्वाधिक १३५ रुग्ण आहेत. फोेंडा येथे १३१ रुग्ण, मडगाव येथे ११८ रुग्ण आहेत. राज्यातील इतर भागातील रुग्ण संख्या शंभरपेक्षा कमी आहे. नवीन १७ रुग्णांना दाखल करण्यात आले आहेत.

नवीन २०३ जणांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारला आहे. राज्यातील आणखी १८८ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ६३ हजार ३४७ एवढी झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.९८ टक्के एवढे आहे.