चोवीस तासांत राज्यात कोरोनाचे नवे 30 रुग्ण

0
8

राज्यात चोवीस तासांत कोरोनाचे नवीन 30 बाधित आढळून आले असून 4 बाधितांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. राज्यात कोरोनाबाधित आढळून येण्याचे प्रमाण 8.9 टक्के एवढे आहे. राज्यातील कोरोना सक्रिय रूग्णसंख्या 300 च्या खाली आली असून ती 297 एवढी आहे. चोवीस तासांत आणखीन 334 स्वॅबच्या नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे. तसेच गेल्या चोवीस तासांत आणखी 71 जण कोरोना मुक्त झाले आहेत.