चोवीस तासांत राज्यात कोरोनाचे ७८ नवे रुग्ण

0
5

राज्यात नवीन कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ कायम असून चोवीस तासांत नवीन ७८ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. राज्यातील सक्रिय रुग्ण संख्या ७४० एवढी झाली आहे. राज्यात कोरोना बाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण ९.५७ टक्के एवढे आहे.

चोवीस तासांत नवीन ८१५ स्वॅबचे नमुने तपासण्यात आले आहेत. त्यातील ७८ नमुने बाधित आढळून आले आहेत. राज्यातील कोरोना बळींची एकूण संख्या ३८३३ एवढी आहे. चोवीस तासांत एकाही बाधिताला इस्पितळात दाखल करावे लागलेले नाही.
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जास्त आहे. मागील चोवीस तासांत आणखी ७१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१५ टक्के एवढे आहे. जून महिन्यात आत्तापर्यंत चार वेळा शंभरपेक्षा जास्त बाधित आढळून आले आहेत. तसेच, या महिन्यात एका कोरोना बळीची नोंद झाली आहे.