31.1 C
Panjim
Friday, November 26, 2021

चोवीस तासांत राज्यात कोरोनाचे २२ नवे रुग्ण

राज्यात गेल्या चोवीस तासांत नवीन २२ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर, कोरोना रुग्णाच्या बळीची नोंद नाही. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या २४६ एवढी झाली आहे तर कोरोना बळींची एकूण संख्या ३३७८ एवढी आहे. राज्यात गेल्या चोवीस तासांत आणखी २० जण कोरोनामुक्त झाले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.९७ टक्के एवढे आहे. गेल्या चोवीस तासांत २८७३ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यातील २२ नमुने बाधित आढळून आले. कोरोनामुक्त झाल्यामुळे इस्पितळातून काल २ जणांना घरी पाठविण्यात आले. तसेच कोरोनाची लक्षणे जाणवल्याने ३ रुग्णांना इस्पितळात दाखल करून घेण्यात आले.

STAY CONNECTED

847FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

- Advertisement -

ALSO IN THIS SECTION