चोपडे येथे स्वयंअपघातात कारचालकाचा जागीच मृत्यू

0
16

चोपडेमार्गे शिवोलीला सुसाट वेगाने जात असलेल्या पर्यटकांच्या एका वाहनाने एका पार्क केलेल्या ट्रकला जबरदस्त धडक दिल्यामुळे चार चाकी वाहनातील मिलिंद उज्वल सिन्हा (झारखंड) हा कारचालक जागीच ठार झाला. तर त्याची पत्नी किरकोळ जखमी झाली. पत्नीला म्हापसा जिल्हा इस्पितळात दाखल करून उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला.

चोपडेमार्गे जाणाऱ्या कारने (केए 03 एनजे 8567) सुरुवातीला चोपडे सर्कलकडील संरक्षण भिंतीला धडक दिली. त्यानंतर त्या ठिकाणी पार्क केलेल्या ट्रकला धडक दिली. ही धडक एवढी जबरदस्त होती की कारचा चक्काचूर झाला व चाल मिलिंद याचा जागीच मृत्यू झाला.
झारखंड येथील मिलिंद सिन्हा याने चोपडे येथे असलेल्या पोलीस नाकाबंदीला न जुमानता अतिवेगाने वाहन चालवत नेले. त्याने प्रथम संरक्षण भिंतीला धडक दिली. त्यानंतर त्या ठिकाणी पार्क केलेल्या ट्रकला जबरदस्त धडक दिली.

मांद्रे पोलीस निरीक्षक गिरेन्द्र नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. शिवाय वाहन चालक मिलिंद सिन्हा यांच्या वडिलांची पोलिसांनी जबानी घेऊन मृतदेह बांबोळी येथे गोमेकॉत शवचिकित्सेसाठी पाठवण्यात आला.