27.6 C
Panjim
Wednesday, May 19, 2021

चेन्नईने किंग्ज पंजाबला लोळवले

>> दीपक चहरची भेदक गोलंदाजी

>> मोईन अलीही चमकला

दु्रतगती गोलंदाज दीपक चहरच्या भेदक मार्‍याच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने पंजाब किंग्जला सहज लोळवत आयपीएलच्या १४व्या पर्वातील आपल्या दुसर्‍या विजयाची नोंद केली. १३ धावांत ४ बळी मिळवलेल्या दीपक चहरची सामनावीर पुरस्कारासाठी निवड झाली.
किंग्ज पंजाबकडून मिळालेले १०७ धावांचे सोपे लक्ष्य चेन्नई सुपर किंग्जने १५.४ षटकांत सहज गाठले. लक्ष्याचा पाठलाग करताना सलामीवीर ऋतुराज गायकवाड (५) प्रारंभीच तंबूत परतला. परंतु त्यानंतर फाफ ड्यूप्लेसिस (नाबाद ३६) आणि मोईन अली (४६) यांनी दुसर्‍या विकेटसाठी ६६ धावांची भागीदारी करीत संघाला विजयासमिप नेले. मोईन अली बाद झाल्यानंतर सुरेश रैना (८) आणि अंबाती रायडू आपले खाते न खोलताच तंबूत परतले. अखेर ड्यूप्लेसिसने आणखी गडी बाद होऊ न देता सॅम करन (नाबाद ५)च्या साथीत विजयी सोपस्कार केले. पंजाबकडून मोहम्मद शमीने २ तर अर्शदीप सिंग व मुरुगन अश्विन यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.

तत्पूर्वी चेन्नईने नाणेेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेत पंजाब किंग्जला ८ बाद १०६ अशा माफक धावसंख्येवर रोखले होते. दीपक चहरच्या भेदक मार्‍यामुळे पंजाबकडून शाहरुख खान वगळता अन्य एकही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही. शाहरूखने ४ चौकार व २ षटकारांसह ३६ चेंडूंत ४७ धावांचे योगदान दिले. झाय रिचर्डसन (१५), ख्रिस गेल व दीपक हूडा यांनी प्रत्येकी १० धावा करीत थोडाफार प्रतिकार केला. अन्य फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. चेन्नईकडून दीपक चहरच्या ४ बळींव्यतिरिक्त सॅम करन, मोईन अली आणि ड्‌वेन ब्राव्हो यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.

धावफलक
पंजाब किंग्ज ः लोकेश राहुल धावचित (रवींद्र जडेजा) ५, मयंक अगरवाल त्रिफळाचित गो. दीपक चहर ०, ख्रिस गेल झे. रवींद्र जडेजा गो. दीपक चहर १०, दीपक हूडा झे. फाफ ड्यूप्लेसिस गो. दीपक चहर १०, निकोलास पूरन झे. शार्दुल ठाकूर गो. दीपक चहर ०, शाहरुख खान झे. रवींद्र जडेजा गो. सॅम करन ४७, झाय रिचर्डसन त्रिफळाचित गो. मोईन अली १५, मुरुगन अश्विन झे. फाफ ड्यूप्लेसिस गो. ड्‌वेन ब्राव्हो ६, मोहम्मद शमी नाबाद ९, रायली मेरेडिथ नाबाद ०.
अवांतर ः ४. एकूण २० षटकांत ८ बाद १०६ धावा.
गोलंदाजी ः दीपक चहर ४/१/१३/४, सॅम करन ३/०/१२/१, शार्दुल ठाकूर ४/०/३५/०, रवींद्र जडेजा ४/०/१९/०, मोईन अली ३/०/१७/१, ड्वेन ब्राव्हो २/०/१०/१.
चेन्नई सुपर किंग्ज ः ऋतूराज गायकवाड झे. दीपक हूडा गो. अर्शदीप सिंग ५, फाफ ड्यूप्लेसिस नाबाद ३६, मोईन अली झे. शाहरुख खान गो. मुरुगन अश्विन ४६, सुरेश रैना झे. लोकेश राहुल गो. मोहम्मद शमी ८, अंबाती रायडू झे. निकोलास पूरन गो. मोहम्मद शमी ०, सॅम करन नाबाद ५.
अवांतर ः ७. एकूण १५.४ षटकांत ४ बाद १०७ धावा.
गोलंदाजी ः मोहम्मद शमी ४/०/२१/२, झाय रिचर्डसन ३/०/२१/ ०, अर्शदीप सिंग २/०/७/१, रायली मेरिडिथ ३.४/०/२१/०, मुरुगन अश्विन ३/०/३२/१.

STAY CONNECTED

848FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

इकडेही लक्ष द्या

कोरोनाचा वणवा राज्यात चहुदिशांनी भडकल्यावर आणि सर्वतोपरी सज्जतेचे दावे उच्च न्यायालयात उघडे पडल्यावर आता राज्य सरकार उपाययोजनांच्या विहिरी खोदायला निघाले आहे. गोवा...

कोरोना बळींची संख्या २ हजारांजवळ

>> राज्यात शुक्रवारी ६१ मृत्यू, २४५५ बाधित, एकूण बळी १९९८ राज्यात गेल्या चोवीस तासांत पुन्हा एकदा उच्चांकी ६१ रुग्णांचा...

प्राणवायूसंदर्भातील उपाययोजनांचा अहवाल उच्च न्यायालयात सादर

राज्य सरकारचे आरोग्य सचिव रवी धवन यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाला गोमेकॉमधील प्राणवायू पुरवठा व इतर समस्या सोडविण्यासाठी हाती घेतलेल्या उपाययोजनांचा...

गोमेकॉत प्राणवायू टाकी बसवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू ः मुख्यमंत्री

बांबोळी येथील गोमेकॉतील वैद्यकीय प्राणवायू पुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी नवीन २० हजार लीटर क्षमतेची प्राणवायू टाकी बसविण्याचे काम जोरात सुरू आहे, अशी माहिती...

कोरोनाविरोधातील युद्ध जिंकणारच ः मोदी

>>किसान सन्मान निधीअंतर्गत शेतकर्‍यांना आठवा हप्ता भारताचे अद्यापही कोरोनाशी सुरू असलेले युद्ध आपण लढणार आणि जिंकणार असल्याचा विश्‍वास पंतप्रधान...

ALSO IN THIS SECTION

येत्या १५ दिवसांत राज्यांना १.९२ कोटी डोस ः जावडेकर

येत्या पंधरा दिवसांत केंद्र सरकारकडून राज्यांना १.९२ कोटी लशींचे डोस देण्यात येतील अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल दिली. देशातील...