29.1 C
Panjim
Wednesday, October 20, 2021

चिनी टेस्ट्‌स किट्‌सची ऑर्डर भारताने केली रद्द

रॅपिड अँटीबॉडी टेस्ट किट्सच्या पुरवठ्याची चीनला देण्यात आलेली ऑर्डर रद्द करण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाने सोमवारी ही माहिती दिली. कोरोना व्हायरसची जलदगतीने चाचणी करून निदान करता यावे, यासाठी चीनमधून हे किट्स मागवण्यात आले होते. पण किट्सचा दर्जा खराब निघाल्यामुळे ऑर्डर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आयसीएमआरने राज्यांना गुआंगझोऊ वोंडफो बायोटेक आणि हुहेई लिव्हझॉन डायग्नॉस्टिक्स या दोन कंपन्यांच्या किट्‌सचा वापर थांबवण्यास सांगितले. त्यानंतर आरोग्य मंत्रालयाने हा निर्णय जाहीर केला.

काही राज्य सरकारांनी चिनी कंपन्यांकडून मागवण्यात आलेल्या रॅपिड टेस्टिंग किट्समधून चुकीचे निदान होत असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर आयसीएमआरकडून या किट्सच्या साहाय्याने चाचणी केल्यानंतर खूप फरक दिसून आला. चिनी कंपन्यांनी जे आश्वासन दिले होते त्या विरोधात हे किट्स असल्याचे आयसीएमआरने म्हटले आहे.

या किट्सचा वापर करू नका, हे किट्स पुन्हा त्या कंपन्यांना परत करा असे आयसीएमआरकडून सांगण्यात आले आहे. कोरोनाचे निदान करण्यासाठी आरटी पीसीआर गळा/नाक स्वॅब चाचणीच सर्वोत्तम आहे. या चाचणीमध्ये सुरुवातीच्या टप्प्यामध्येच व्हायरस असल्यास समजतो,  असे आयसीएमआरने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

STAY CONNECTED

847FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

प्रश्न खड्‌ड्यांचा

रस्त्यांना पडलेल्या खड्‌ड्यांवरून आणि नव्याने बांधकाम होत असलेल्या महामार्गांच्या दुर्दशेवरून विरोधकांनी काल राज्य विधानसभेत सरकारला घेरले. राज्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेसंबंधी आम्हीही वेळोवेळी आवाज...

खराब महामार्गामुळे विधानसभेत गदारोळ

>> कंत्राटदाराला नोटीस पाठवल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती पत्रादेवी ते काणकोण या सहापदरी राष्ट्रीय महामार्गाच्या निकृष्ट कामावरून काल विधानसभेत विरोधकांनी गोंधळ...

भंडारी समाजाला ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण नाही

>> पालयेकर यांचा विधानसभेत आरोप ओबीसीसाठी जे आरक्षण आहे त्या कोट्यातून भंडारी समाजाला जेवढे आरक्षण मिळायला हवे तेवढे ते...

नोकरभरतीसाठी कंत्राटी कामगारांना प्राधान्य देण्याची खंवटेंची मागणी

विविध सरकारी खात्यांत नव्याने नोकरभरती करण्यापूर्वी त्या त्या खात्यांत गेल्या कित्येक वर्षांपासून कंत्राटी पद्धतीवर काम करणार्‍या कर्मचार्‍यांना अगोदर सेवेत कायम केले जावे,...

भारतात कोरोनाचे ९९ कोटी लसीकरण

>> केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती भारतात १६ जानेवारीपासून सुरू करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेने काल तब्बल ९९ कोटींचा टप्पा गाठला...

ALSO IN THIS SECTION

भूमिपुत्र विधेयक राज्यपालांकडे पाठवणार नाही ः मुख्यमंत्री

गेल्या पावसाळी अधिवेशनात गोवा विधानसभेत संमत करण्यात आलेले भूमिपुत्र अधिकारिणी विधेयक हे अद्याप कायदा खात्याकडेच आहे व ते मंजुरीसाठी राज्यपालांकडे पाठवणार नसल्याचा...