चावडीतील चार दुकाने एकाच रात्री फोडली

0
66

पाळोळे येथील साई उर्फ भागडू देसाई यांची दुकाने फोडून पंधरा दिवस झाले नाही तोच चावडी वरील ओंकार बिल्डिंगमधील चार दुकाने फोडण्याची घटना ९ रोजी रात्रौ घडली. भर रस्त्यावर असलेल्या या चारही दुकानांची शटर्स वाकवून चोरट्यांनी आत प्रवेश केला.

या इमारतीमधील ओंकार बिल्डर्स, रायकर एंटर प्रायझेस, टोनी स्टोअर्स आणि एका घाऊक दारुच्या दुकानात चोरट्यांनी प्रवेश केला. यात नेमकी किती किमतीचा माल चोरला त्याची माहिती मिळू शकली नाही.