चार नवीन रेल्वे प्रकल्पांना मान्यता

0
3

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यात एकूण 24,634 कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. त्यात चार नवीन रेल्वे प्रकल्पांचाही समावेश आहे. मध्य प्रदेशातील इटारसी-भोपाळ-बीना मार्गावरील 237 किमी लांबीचा चौथा मार्ग आणि गुजरात आणि मध्य प्रदेशला जोडणारा वडोदरा-रतलाम मार्गावरील 259 किमी लांबीचा तिसरा आणि चौथा मार्ग समाविष्ट आहे. महाराष्ट्र व छत्तीसगडमधील गोंदिया – डोंगरगड दरम्यानची 84 किमीचा चौथा मार्ग आणि महाराष्ट्रातील वर्धा-भुसावळ हा 314 किमीचा तिसरा आणि चौथा मार्ग समाविष्ट आहे.