चार चाकी गाड्या चोरणार्‍या पर्यटकास पोलिसांनी पकडले

0
89

गेल्या ८ नोव्हेंबर रोजी नेरूलहून पर्यटक म्हणून आलेल्या अ’ीर अफरोज वदारिया (मुंबई) व त्याचा भाऊ अहमद वदारिया यांनी जीए ०३ पी ८०५६ आय १० व जीए ०११ ए १३०१ कार पळवून नेल्याप्रकरणी कलंगुट पोलिसांनी अमीर अफरोज वदारिया याला अटक केली. तर अहमद पळून गेला. पोलिसांनी संशयिताबरोबर वाहनेही ताब्यात घेतली आहेत. कळंगुट पोलीस ही वाहने चोरीस गेल्यापासून त्या वाहनांच्या आणि चोरट्यांच्या मागावर होते. काल पहाटे पोलीस निरीक्षक राजेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अरुण मांद्रेकर, गोविंद पटनाईक, विजय बागकर यांनी सापळा रचून चोरट्यांना अटक करून त्याच्याकडील दोन्ही वाहने ताब्यात घेतली. अमीर वदारिया याला अटक केली. मात्र त्याचा भाऊ पळण्यात यशस्वी ठरला. कळंगुटमध्ये पर्यटक म्हणून येणारे लोक वाहने भाड्याने घेतात आणि ती घेऊन पळ काढतात अशा वाहन चालकाने सावधगिरी बाळगण्याचे आवाहनही पोलिसांनी केले आहे.