काल सायंकाळी ५.३०च्या दरम्यान म्हापसा गांधी चौक येथे तिघा भेलपुरीवाल्यांवर चाकूने हल्ला केल्याप्रकरणी कळंगुट येथील संतोष कळंगुटकर (३६) याला पोलिसांनी अटक केली. उपेंद्र जैसवाल, मून्ना गौड व मनोज जैसवाल भेलपुरीची गाडी घेऊन जात असता त्यांची संतोषशी बाचाबाची झाली.
यावेळी तो धमकी देऊन गेला व काही वेळानंतर साथीदारांसह येऊन त्याने चाकूने दोघांना गंभीर जखमी केले अशी तक्रार आहे.

