27 C
Panjim
Tuesday, October 27, 2020

चर्चिल ब्रदर्सला मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा

आय लीग व चर्चिल ब्रदर्स क्लबचे म्हणणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐकून घेण्यासाठी राज्य सरकारचा पूर्ण पाठिंबा असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल सोमवारी सांगितले. युवा खेळाडूंचे भवितव्य, क्लबचा संपन्न इतिहास व देशाच्या फुटबॉलसाठी त्यांनी दिलेले योगदान नजरेसमोर ठेवून पंतप्रधानांनी या प्रकरणी हस्तक्षेप करण्याची मागणी त्यांनी केली.

क्लबचे अध्यक्ष चर्चिल आलेमाव, मुख्य कार्यकारी अधिकारी वालंका आलेमाव यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
मागील चार दशकापासून फुटबॉलने गोव्याला व देशाला खूप काही दिले आहे. फुटबॉल हा गोव्याचा प्राण आहे. गोव्याच्या चर्चिल ब्रदर्ससह देशातील काही अन्य क्लबांनी भारतीय फुटबॉलच्या कोसळत्या डोलार्‍याला सावरण्यासाठी पंतप्रधान मोदींच्या हस्तक्षेपाची केलेली मागणी रास्त असून राज्य सरकारच्या वतीने सर्व मदत केेली जाईल असे आश्‍वासन त्यांनी दिले.

धेंपो, साळगावकर व स्पोर्टिंग क्लब दी गोवा यांनी आय लीगमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर चर्चिल ब्रदर्स हा या स्पर्धेत खेळणारा एकमेव गोमंतकीय संघ राहिला आहे. आय लीग (२००८-०९), (२०१२-११३), ड्युरंड कप (२००७, २००९, २०११), फेडरेशन कप (२०१३-१४) या स्पर्धा चर्चिलने जिंकल्या आहेत. एफसी कप सारख्य प्रतिष्ठेच्या स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी क्लबला मिळाली होती. त्यामुळे क्लबची कामगिरी लक्षात घेणे अपेक्षित असल्याचे वालंका आलेमाव यांनी क्लबची बाजू मांडताना म्हटले आहे.

संपूर्ण देशातील फुटबॉल खेळाडूंना व्यासपीठ देण्याचे काम चर्चिल ब्रदर्सने केले आहे. आय लीग या स्पर्धेचा प्रथम दर्जा हटविल्यास देशातील फुटबॉलचे प्रचंड नुकसान होणार आहे. आयएसएलमध्ये क्लब-फ्रेंचायझीच्या उन्नती किंवा अवनतीची कोणतीही सोय करण्यात आलेली नाही. त्यामुळे या स्पर्धेला ‘लीग’ म्हणणे योग्य ठरणार नाही तसेच यामध्ये प्रवेश करण्याची कोणतीही संधी इतर क्लबांना नाही. आयपीएलप्रमाणेच केवळ आर्थिक हित लक्षात घेऊन या स्पर्धेची रचना करण्यात आली असून यामुळे ‘ती’ प्रथम दर्जाची स्पर्धा होऊच शकत नाही. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाकडे फुटबॉलच्या विस्तार व विकासासाठी निश्‍चित धोरण नसल्यानेच गोव्यातील इतर क्लबांनी आय लीगमधून काढता पाय घेतल्याचे वालंका यांनी सांगत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे आभार मानले.

‘फुटबॉल हा गोमंतकीयांना जोडणारा समान धागा आहे. भारतीय फुटबॉलला गोव्याने अनेक दिग्गज दिले आहेत. गोव्यातील आघाडींच्या क्लबांपैकी एक असलेल्या चर्चिल ब्रदर्स एफसीचे गार्‍हाणे ऐकण्याचे विनंती मी पंतप्रधानांना करतो.’
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

STAY CONNECTED

845FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

दसरा आणि सीमोल्लंघन

प्रा. रमेश सप्रे पूर्वीची सांस्कृतिक कोवळीक जाऊन आजकाल याला बाजारू स्वरूप आलंय. संस्कृती कुठे नि केव्हा निसटली हे...

सांवल्यांचें गाणें

डॉ. सोमनाथ कोमरपंत जास्तीत जास्त सुलभ शब्दांमधून भाषेचा गोडवा अनुभवायला लावणारी, अवतीभवतीच्या निसर्गाविषयी ओढ लावणारी, मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव...

घसरलेल्या व्याजदरांमुळे वैयक्तिक बचतीत घसरण

शशांक मो. गुळगुळे अर्थव्यवस्थेला उभारी मिळावी म्हणून घसरलेल्या व्याजदरांमुळे जनतेचे उत्पन्न कमी झाले आहे. पण उद्योगधंद्याना उभारी मिळावी...

मीलन प्रकृती-पुरुषाचे

पौर्णिमा केरकर जमिनीत जे पिकलेले आहे त्याला मातृतत्त्व आणि पुरुषतत्त्वांच्या मीलनाची पार्श्वभूमी लाभलेली आहे. ग्रामदेवी सातेरी स्त्रीतत्त्वाचे प्रतीक...

दसरा सण मोठा…

मीना समुद्र घट हे मानवी देहाचेच प्रतीक आणि तेवता दीप म्हणजे त्या देहात जागणारे चैतन्य. ते चैतन्य कामाधामातून...

ALSO IN THIS SECTION

औद्योगिक वसाहतींत थेट प्रवासी वाहतूक

>> मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची माहिती, कदंब महामंडळाचा ४० वा वर्धापनदिन कदंब वाहतूक मंडळाच्या माध्यमातून गाव ते औद्योगिक वसाहती...

रेलमार्ग दुपदरीकरणास विरोध : आल्मेदा

दक्षिणमध्य रेल्वेच्या दुपदरीकरणास आपलाही विरोध असल्याचे काल सत्ताधारी भाजपचे आमदार कार्लुस आल्मेदा यांनी काल एका वेबपोर्टलला दिलेल्या मुलाखतीतून स्पष्ट केले. भाजपच्या कुठ्ठाळीच्या...

श्रीपाद नाईक आज दिल्लीला रवाना

केंद्रीय आयुष व संरक्षण राज्यमंत्री असलेले उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक हे सुमारे अडीच महिन्यानंतर आज सोमवारी नवी दिल्लीकडे रवाना होणार आहेत....

ऑक्टोबरमध्ये कोरोनामुक्त रुग्णांची संख्या वाढली

>> रविवारी ६ मृत्यू, ३२१ रुग्ण बरे राज्यात चोवीस तासांत नवीन २११ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून आणखी...

येत्या आठवड्यात १०, १२वीबाबत निर्णय

>> मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषदेत माहिती कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील दहावी आणि बारावीच्या वर्गाबाबत येत्या आठवड्यात निर्णय घेतला जाणार आहे,...