29 C
Panjim
Sunday, October 25, 2020

चर्चिल ब्रदर्सकडून वास्कोचा धुव्वा

>> गोवा प्रो-लीग फुटबॉल

चर्चिल ब्रदर्स स्पोर्ट्‌स क्लबने वास्को स्पोर्ट्‌स क्लबचा ५-१ असा धुव्वा उडवित गोवा फुटबॉल संघटना आयोजित गोवा प्रो-लीग फुटबॉल स्पर्धेत काल पूर्ण गुणांची कमाई केली. नागोवा ग्रामपंचायत मैदानावर खेळविण्यात आलेल्या या सामन्यात चर्चिल ब्रदर्स संघाने १०व्याच मिनिटाला आपले खाते खोलले. वास्कोच्या मैंदो दादानुवूरने चर्चिल ब्रदर्सच्या खेळाडूलला डी कक्षेत धोकादायरित्या खाली पाडल्याने रेफ्रीने पेनल्टी बहाल केली. त्यावर कोणतीही चूक न करता लालखावंपुईमावियाने चर्चिलला १-० अशा आघाडीवर नेणारा हा गोल नोंदविला. ३०व्या मिनिटाला क्वॅनकडून मिळालेल्या पासवर लालेंग्झामा वांगचिहियाने चर्चिल ब्रदर्सची आघाडी २-० अशी केली. ४३व्या मिनिटाला मिकी वाझने गोल नोंदवित वास्को स्पोर्ट्‌स क्लबची पिछडी २-१ अशी कमी केली. पहिल्या सत्रात चर्चिल ब्रदर्सने आपली २-१ अशी आघाडी राखली. दुसर्‍या सत्रात ६१व्या मिनिटाला वास्कोच्या अमित दासकडून स्वयंगोलाची नोंद झाल्याने चर्चिल ब्रदर्सला ३-१ अशी आघाडी मिळाली. ६४व्या मिनटाला लामगोलेन हँगशिंगने पेनल्टीवर गोल नोंदवित संघाची आघाडी ४-१ अशी मजबूत केली. तर ७२व्या मिनिटाला मॉविन बॉर्जीसने गोल नोंदवित चर्चिल ब्रदर्सच्या ५-१ अशा एकतर्फी विजयावर शिक्कामोर्तब केला.

STAY CONNECTED

845FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

वैज्ञानिक दृष्टिकोन व आत्मनिर्भर भारत

प्रदीप गोविंद मसुरकर(मुख्याध्यापक) प्रत्येक मुलामध्ये वेगवेगळ्या क्षमता आणि आवडीनिवडी असतात. त्याप्रमाणे आम्ही डोळसपणे वातावरणनिर्मिती केल्यास ते चांगले वक्ते,...

रंग पत्रांचे…

सौ. प्राजक्ता प्र. गावकर(नगरगाव-वाळपई) पत्र ते पत्रच. त्याची जागा कुणीही घेऊ शकणार नाही. सीमेवर तैनात असलेल्या प्रत्येक जवानाला...

शुभाशुभ शकुन (?)

नारायण बर्वे शुभाशुभ शकुन होतच असतात. आपल्याला पूर्वकल्पना येते येवढेच. असेकाही पूर्वसंकेत मिळाले तरी घाबरून न जाता संकटाशी...

थोडं मुक्त.. थोडं बद्ध..

सौ. माधुरी रं. शे. उसगावकर(फोंडा) स्त्रीने खरं तर स्त्रीच असावं. तिने पुरुषाप्रमाणे वागूच नये. जुन्या चालीरीती झुगारून देऊ...

अपरिहार्य

गंभीर आर्थिक संकटाला सतत सामोरे जात असलेल्या राज्य सरकारने अखेर लाडली लक्ष्मी या आपल्या लोकप्रिय योजनेसाठीची वार्षिक उत्पन्न मर्यादा आठ लाख रुपयांवरून...

ALSO IN THIS SECTION

प्लाझ्मा उपचार पद्धती चालूच ठेवणार

>> आरोग्यमंत्र्यांची माहिती, २६३ जणांवर प्लाझ्मा थेरपी गंभीर अवस्थेतील कोरोना रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी प्लाझ्मा उपचार पद्धतीचा बराच फायदा होत...

गृहआधार योजनेसाठी दरवर्षी उत्पन्न, हयात दाखल्याची सक्ती

>> महिला, बाल कल्याण खात्याचा निर्णय महिला आणि बाल कल्याण खात्याने गृहआधार योजनेच्या लाभार्थींंना दरवर्षी उत्पन्न आणि हयात दाखला...

मध्यप्रदेशातील कोळसा खाणीसाठी सल्लागार कंपनीची निवड ः मुख्यमंत्री

>> पीपीपी सुकाणू समितीच्या बैठकीत निर्णय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखालील पीपीपी सुकाणू समितीच्या काल घेण्यात आलेल्या बैठकीत...

लुटणार्‍यांना पुन्हा संधी नको ः मोदी

>> बिहारमध्ये पंतप्रधानांच्या तीन प्रचार सभा बिहारला लुटणार्‍या लोकांना पुन्हा राज्यात संधी देऊ नका असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी...

एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये रीतसर प्रवेश

भाजपच्या सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिलेल्या एकनाथ खडसे यांनी काल शुक्रवारी अखेर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत रीतसर प्रवेश केला. राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील...