पुढे बोलताना ते म्हणाले की चर्चने भाजपला कधीही जातीयवादी पक्ष संबोधलेले नाही. कॉंग्रेस हाच खरा जातीयवादी पक्ष असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. आपण धर्मनिरपेक्षता मानणारा असून आपण मंदिराबरोबरच चर्चमध्येही जात असल्याचे ते म्हणाले.
विजय निश्चित
सर्व पक्षांना मागे टाकून भाजपने उत्तर व दक्षिण गोव्यात जोरदार प्रचार केलेला असून दोन्ही ठिकाणी भाजपचा विजय हा निश्चित असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.
उत्तर गोव्यातील प्रमुख मुद्दे कोणते असे विचारले असता खाण हा मुख्य मुद्दा असल्याचे ते म्हणाले. खाणी बंद पडल्याने लोकांवर संकट कोसळलेले असून कायदेशीर खाणी लवकर सुरु व्हायला हव्यात व तसा भाजपचा सत्तेवर आल्यानंतर प्रयत्न असेल, असे ते म्हणाले.
मोपा विमानतळाविषयी विचारले असता ते म्हणाले की, मोपा विमानतळाची गोव्याला गरज आहे. गोव्याचे पर्यटन मोपामुळे वाढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गोव्यात वर्षाला २ हजार चार्टर विमाने येऊ पाहत आहेत. पण दाबोळी विमानतळाच्या मर्यादेमुळे ते शक्य होत नाही. गोवा हा कार्गो टब होण्याची गरज आहे. ती गरज मोपा विमानतळ पूर्ण करणार असल्याचे ते म्हणाले.
मोपा झाल्यानंतर हवाई प्रवाशांचीच सोय होणार नसून अन्य उद्योगानाही चालना मिळणार आहे. मोपामध्ये जमीन घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी यावेळी फेटाळून लावला.
भाजप सरकार आल्यास विशेष दर्जा
भाजप सरकार सत्तेवर आल्यास गोव्याला विशेष दर्जा देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. गोव्याच्या जमिनी बाहेरच्या लोकांना विकत घेता येऊ नयेत यासाठी हा विशेष दर्जा असेल, असे ते म्हणाले. राज्यातील अमली पदार्थ व्यवसायाविषयी विचारले असता आम्हाला त्याची कल्पना आहे. केंद्रात सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे ते म्हणाले. मांद्रे-आश्वें भागात रशियन नागरिक जो धुडगूस घालीत असतात त्याविषयी विचारले असता रशियन नागरिकांची दादागिरी सहन केली जाणार नसल्याचे व त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचे ते म्हणाले.
सर्व निधी विकासकामावर खर्च
खासदार निधीखाली जो निधी मिळाला होता तो आपण सर्व खर्च केलेला असल्याचे श्रीपाद नाईक यांनी सांगितले. दोन्ही खासदारांनी मिळून १७ कोटी रु. एवढा निधी खर्च केला नसल्याचे परवा ङ्गनॅशनल इलेक्शन वॉचफने पत्रकारांना सांगितले होते. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना आपण सर्व निधी खर्च केला आहे. एक-एकदा प्रकल्पाचे पैसे जिल्हाधिकार्यांकडे पडून राहतात. एक एकदा कंत्राटदाराचे पैसे द्यायचे राहिलेले असतात. याचा अर्थ ते पैसे खर्च केले नाहीत असे होत नाही असे त्यांनी स्पष्ट केले. उत्तर गोव्यातील बराचसा प्रचार पूर्ण झालेला असून असता प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एक सभा घेणे सुरू केले आहे. येत्या ८ रोजीपर्यंत सर्व मतदारसंघात या सभा घेण्याचे काम पूर्ण होणार असल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले.
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारेन
केंद्रात भाजपचे सरकार सत्तेवर आल्यास मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची वर्णी केंद्रीय मंत्रिमंडळात लागणार असल्याचे जे वृत्त आहे ते किती खरे आहे असे पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले की पर्रीकर किंवा आपण कधीही पक्षाकडे कुठले पद मागितले नाही. पक्षाने जी जबाबदारी दिली ती आम्ही स्वीकारली. यापुढेही आम्ही तसेच करू.

