पॉंटी व हरदीप चढ्ढा खून प्रकरणातील आरोपी एस एस नामधारी यांना भारतीय जनता पक्षाने काल पक्षातून बडतर्फ केले. नामधारी यांना नुकतीच पॉंटी चढ्ढा हत्या प्रकरणी अटक झाली आहे. छत्तरपूर येथील फार्महाऊसवर चढ्ढा बंधूंमध्ये मालमत्तेच्या वादातून भांडण झाले होते व त्यानंतर एकमेकांवर केलेल्या गोळीबारात दोघेही भाऊ ठार झाले होते.
नामधारी हे पक्षाचे सक्रिय सदस्य नव्हते, परंतु उत्तराखंडमध्ये २०१० मध्ये पक्षाचे सरकार आल्यावर तेथील अल्पसंख्यक आयोगाचे अध्यक्ष नेमण्यात आले होते, अशी माहिती भाजपच्या वतीने देण्यात आली.

