चंद्राबाबूंच्या कोठडीत 5 ऑक्टोबरपर्यंत वाढ

0
19

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू यांच्या कोठडीत 5 ऑक्टोंबरपर्यंत वाढ केली आहे. कौशल विकास घोटाळ्याप्रकरणी चंद्राबाबू नायडू यांना अटक करण्यात आली होती. नायडू यांच्या वतीने ज्येष्ठ वकील हरीश साळवे बाजू मांडत आहेत. दोन दिवसांपूर्वी चंद्राबाबू यांनी उच्च न्यायालयात धाव घेत त्यांच्याविरोधातील एफआयआर मागे घेण्याची मागणी केली होती. याप्रकरणातील एफआयआर रद्द करण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला होता. चंद्राबाबू नायडू यांना सीबीआयने 9 सप्टेंबर रोजी अटक केली होती. स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या निधीचा गैरवापर केल्याप्रकरणी चंद्राबाबू नायडू यांना अटक करण्यात आली आहे. या घोटाळ्यामुळे राज्य सरकारचे 300 कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याचे आंध्र प्रदेश राज्याचे सीआयडी प्रमुख एन संजय यांनी म्हटले होते.