घुसखोरी केलेल्या बांगलादेशी महिलेला हरमलमधून अटक

0
13

हरमल येथे एका बांगलादेशी महिलेने घुसखोरी केल्याप्रकरणी मांद्रे पोलिसांनी तिला अटक केली. हरमल समुद्रकिनारी भागात पार्किंग जागेमध्ये शनिवारी 27 रोजी सायंकाळी 5:30 च्या दरम्यान शर्मिन बीबी जांतुर सिंगर (32) ही बांगलादेशी महिला संशयास्पदरित्या फिरत असल्याची तक्रार आल्यानंतर पोलीस टीमने तिला ताब्यात घेतले. तिच्याकडे चौकशी केल्यानंतर ती बांगलादेशी रहिवासी असून तिच्याकडे कसल्याच प्रकारचे कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे आढळून आले. पोलिसांनी चौकशी करून तिच्यावर गुन्हा नोंदवून तिला अटक केली आहे. पुढील तपास मांद्रे पोलीस निरीक्षक गीरेंद्र नाईक करीत आहेत.