घुसखोरीच्या प्रयत्नातील दोन अतिरेकी पूँछ भागात ठार

0
45
जम्मू काश्मीरच्या पूँछ भागातून घुसण्याच्या प्रयत्नात असलेल्या अतिरेक्यांचा डाव काल लष्कराच्या जवानांनी यशस्वीरित्या उधळून लावला. या वेळी उडालेल्या चकमकीत दोन अतिरेकी ठार झाले. संरक्षण खात्याच्या प्रवक्त्याने या विषयी माहिती देताना सांगितले की शुक्रवारी संध्याकाळी अतिरेक्यांची एक टोळी पूँछ भागातून घुसण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती मिळाली होती.

दोन अतिरेकी ठार झाल्यानंतरही इतरांचा शोध घेण्याचे काम चालू होते. या दरम्यान लष्कराचा एक जवान जखमी झाला असून त्याला इस्पितळात दाखल करण्यात आल्याचे या प्रवक्त्याने सांगितले.