सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा झटका बसला असून स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर जवळपास 29 रूपयांनी महाग झाला आहे. नवे दर काल दि. 7 जूनपासूनच लागू झाले आहेत. गेल्या तीन महिन्यात सिलेंडरच्या दरात 89 रुपयांची वाढ झाली आहे.
14.2 किलोचा स्वयंपाकाच्या सिलेंडर गॅसचे नवे दर कालपासून लागू झाले आहेत. 927 रुपयांना मिळणारा गॅस सिलेंडर आता 956 रुपयांना मिळणार आहे. याआधी 7 मार्च रोजी तेल कंपन्यांनी सिलेंडरच्या दरात 60 रुपयांची वाढ केली होती. गेल्या तीन महिन्यांमध्ये सिलिंडरच्या दरात 89 रुपयांची वाढ झाली आहे. होर्मुझ सामुद्रधुनीच्या संकटानंतर पेट्रोलियम उत्पादने सातत्याने महाग होत आहेत. त्यामुळे पेट्रोल डिझेलप्रमाणे गॅसच्या किंमती ही भरमसाट वाढत आहेत. अजूनही अमेरिका इराण युद्धाचा शेवट झालेला नाही. शिवाय पर्यायी व्यवस्थाही झालेली नाही. सरकारकडून वेगवेगळे दावे केले जात आहे. पण प्रत्यक्षात महागाईचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे.

