घटक राज्य दिनानिमित्त ३५ मान्यवरांचा सन्मान

0
34

गोवा घटक राज्य दिनानिमित्त आज सोमवार ३० मे २०२२ रोजी सकाळी ११ वाजता दोनापावल येथील राजभवनाच्या दरबार सभागृहात खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात राज्याच्या विकासात योगदान दिलेल्या ३५ मान्यवरांचा सन्मान केला जाणार आहे. त्यात १२ माजी मुख्यमंत्री व २३ इतर मान्यवरांचा समावेश आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, खास निमंत्रित म्हणून केंद्रीय संस्कृती, पर्यटन मंत्री जी. किशन रेड्डी, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उपस्थित राहणार आहेत.