गोव्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसवली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना ग्रामपंचायत कार्यालयांमधून सीसीटीव्ही फुटेज मिळवणे शक्य होईल, अशी माहिती राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाला काल दिली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात ग्रामपंचायत कार्यालयात सीसीटीव्ही यंत्रणेसंबंधी एक याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी अतिरिक्त सरकारी वकिलांनी ही माहिती सादर केली. या याचिकेवरील पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी निश्चित करण्यात आली आहे. या याचिकेशी संबंधित आणखीन एका याचिकेवर सुनावणी होणार आहे.

