Home बातम्या ग्रंथ संमेलनाचे आज उद्घाटन

ग्रंथ संमेलनाचे आज उद्घाटन

0
बिल्वदल साखळीतर्फे कला अकादमीच्या दर्या संगम येथे आयोजित केलेल्या संत सोहिरोबानाथ आंबिये ग्रंथ संमेलनाचे आज बुधवार दि. २६ रोजी संध्याकाळी ५.३० वा. उद्घाटन होईल. यानिमित्त सकाळी १०.३० वा. ध्वजारोहण होईल. ३.३० वा. आझाद मैदानापासून दिंडी काढण्यात येणार असून याचे उद्घाटन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

तर संध्याकाळी ५.३० वा. रीतसर उद्घाटन होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, अध्यक्षपदी सभापती राजेंद्र आर्लेकर, प्रमुख वक्ते प्रा. अनिल सामंत उपस्थित राहणार आहेत. ७.३० वा. सांस्कृतिक कार्यक्रम तर ८ वा. डॉ. महेश केळुस्कर व विष्णू वाघ यांच्या अध्यक्षतेखाली कवीसंमेलन होणार आहे.