गौण खनिज क्षेत्राच्या पुनर्वसनासाठी शुल्क निश्चित

0
16

खाण खात्याने गौण खनिजाचे उत्खनन करणाऱ्या व्यावसायिकांकडून गौण खनिज क्षेत्राच्या पुनर्वसनासाठी आकारण्यात येणारे शुल्क काल अधिसूचित केले.

राज्यात पर्यावरण प्रभाव मूल्यांकन प्राधिकरणाने पर्यावरण मंजुरी अंतर्गत परवानगी दिलेल्या गौण खनिजाच्या उत्खननाच्या प्रमाणाच्या आधारे उत्खनन केलेल्या क्षेत्रांचे पुनर्वसन करण्याच्या उद्देशाने गौण खनिज व्यावसायिकांकडून वसूल करण्यात येणारे शुल्क अधिसूचित केले आहे. त्यानुसार 2500 घनमीटरपर्यंत वार्षिक 25 हजार रुपये, 2500 घनमीटर ते 5000 घनमीटरसाठी वार्षिक 50 हजार रुपये, 5000 घनमीटर ते 10000 घनमीटरसाठी वार्षिक एक लाख रुपये, 10000 ते 20000 घनमीटरसाठी वार्षिक 2 लाख रुपये, 20,000 घन मीटरपेक्षा अधिक क्षेत्रासाठी वार्षिक 4 लाख असा शुल्क आकारला जाणार आहे. ही रक्कम लीजच्या संपूर्ण कालावधीसाठी लागू केली जाणार आहे. सदर शुल्काची रक्कम लीजच्या डीडच्या अंमलबजावणीच्या वेळी गोळा केली जाणार आहे.