गोव्यासह तीन राज्यांतून बेहिशोबी मालमत्ता जप्त

0
22

गोवा, बंगळुरू व मुंबई येथील काही बांधकाम व्यावसायिकांवर आयकर खात्याने मारलेल्या छाप्यात तब्बल १३०० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता सापडली असून, त्याशिवाय २४ कोटी रुपयांची रोख रक्कम व दागिनेही सापडले आहेत. आयकर खात्याने गेल्या २० ऑक्टोबर व २ नोव्हेंबर रोजी या दिवशी टाकलेल्या छाप्यात ही बेहिशोबी मालमत्ता सापडली.

विविध बांधकाम विकासकांशी संयुक्त विकासविषयक करार केलेल्या काही व्यक्तींवर आयकर खात्याने मारलेल्या छाप्यात ही बेहिशोबी मालमत्ता सापडली. कागदपत्रे व डिजिटल डेटा या स्वरुपात बेहिशोबी मालमत्तेचे पुरावे सापडले आहेत. हे पुरावे आयकर खात्याने जप्त केले आहेत.