गोव्यात २७ पासून शिमगोत्सव कार्यक्रम

0
46

त्यासाठी सरकारने पायाभूत सुविधांसाठी १ कोटी १४ लाख रुपये तर बक्षिसांसाठी ६६ लाख रुपये मंजूर केल्याची माहिती पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पणजी शिमगोत्सव समितीचे अध्यक्ष तथा धेंपो उद्योग समूहाचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपो उपस्थित होते.

पणजी ही राज्याची राजधानी असून येथील महोत्सवात मोठ्या प्रमाणात देशीविदेशी नागरिक सहभागी होऊन आनंद लुटतात. त्यामुळे येथील उत्सवासाठी ६ लाख रुपयांची बक्षिसे व २० लाख रुपये पायाभूत सुविधांवर खर्च करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दि. ३० रोजी पणजीतील महोत्सव होणार आहे. पणजीतील शिमगोत्सव कार्यक्रमाला अभिनेते विक्रम गोखले उपसिस्थित राहतील. कायर्ंक्रमानिमितत्त राजधानीत सुशोभिकरणांचे काम जोरात चालू असून पुढील दोन दिवसांत ते पूर्ण होईल, असे परुळेकर यांनी सांगितले.

पणजी शिमगोत्सव समितीला यंदा २५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे यंदा आगळ्या वेगळ्या पध्दतीने हा उत्सव साजरा केला जाणार असून सरकारकडून चांगले सहकार्य मिळाल्याचे समितीचे अध्यक्ष धेपो यांनी सांगितले.

दि. २५ रोजी संध्याकाळी ४.३० वाजता महोत्सवस्थळी पूजा करून या उत्सवाचा आरंभ होईल. दि. ३१ रोजीपर्यंत येथील आझाद मैदानावर विविध कार्यक्रमांतून हा उत्सव साजरा केला जाईल, असे त्यांनी सांगितले. दि. २७ रोजी संध्याकाळी ४ वाजता चित्ररथ व रोमटांमेळ तसेच लोकनृत्यांची मिरवणूक निघेल. अकादमीकडून १८ जून मार्गे ही मिरवणूक आझाद मैदानावर येइल.

बक्षीस वितरणाचा कार्यक्रम उशीरा रात्री होऊ नये म्हणून प्रयत्न असेल. शिमगोत्सव हा महत्वाचा उत्सव असल्याने रात्री बारावाजेपर्यंत ध्वनिक्षेपक लावण्यास मान्यता मिळावी म्हणून मुख्यमंत्र्यांकडे प्रयत्न चालू असल्याचे धेंपो यांनी सांगितले. ग्रामीण भागातील संस्कृतीचे राजधानीत दर्शन होऊन या क्षेत्रातील कलाकारांना संधी देणे हा या उत्सवामागच्या प्रमुख हेतू असल्याचे त्यांनी सांगितले.

कला क्षेत्रातील विद्याथ्यार्र्ंना शिष्यवृत्ती

समितीतर्फे उभारण्यात येणार्‍या निधीतून कला क्षेत्रातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचे गेल्या वर्षी जाहीर केले होते. त्यानुसार गोवा कला अकादमीला ४ व संगीत महाविद्यालयातील २ मिळून ६ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड केलेली असून त्यांना पाच हजार रुपये देणार असल्याची माहिती धेंपो यांनी दिली. शहरात मोठे कार्यालय स्थापन करून तेथे कलेचे वर्ग सुरू करण्याचा विचार त्यांनी व्यक्त केला. वर्षपध्दतीप्रमाणे यंदाही कलाकारांचा सत्कार करण्यात येणार असून त्यात भजनी कलाकार मधुसूदन च्यारी, तियात्रा कलाकार ज्यॉस्पिना डायस व हार्मोनियमवादक मनोहर सार्तोडेकर यांचा समावेश असल्याचे धेंपो यांनी सांगितले.

दि. २६ रोजी संध्याकाळी ६ वाजता डॉ. प्रवीण गांवकर यांचा रंगी रंगला श्रीरंग’, दि. २७ रोजी सकाळी ८.३० वा ते दुपारी १२.३० दरम्यान गुलालोत्सव, संध्याकाळी ६ वाजता सांगली येथील मोनिका करंदिकर यांचा खेळ खेळूया कृष्णा राधेवनीकार्यक्रम रात्री ९.३० ते १२.३० या वेळेत रुद्रेश फोंडेकर यांचा कोकणी, मराठी, हिंदी गीतांचा कार्यक्रम. दि. २८ रोजी कोल्हापूर येथील कलाकारांचा ऑर्केस्ट्रा, दि. २९ रोजी वेदवंतीपुणेतर्फे लाख लाख चंदेरी’, दि. ३० रोजी चित्ररथ मिरवणूक व दि. ३१ रोजी संध्याकाळी ७.३० वाजता मुंबई येथील उदय साठमतर्फे लावणी, असे कार्यक्रम आयोजित केले आहेत. पत्रकार परिषदेत संदीप नाईक, मंगलदास नाईक, शांताराम नाईक व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.