गोव्यात महागाई, बेरोजगारीचा कळस

0
10

>> कॉंग्रेसच्या राष्ट्रीय युवा अध्यक्षांची टीका

भाजप सरकारच्या गोव्यातील राजवटीत महागाईने व बेरोजगारीने कधी नव्हे, एवढा कळस गाठला आहे. अन्य सर्व क्षेत्रातही बिकट परिस्थिती आहे, अशा शब्दांत काल कॉंग्रेसचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष श्रीनिवास बी. व्ही. यांनी भाजप सरकारवर टीका केली.

भाजपच्या रेल्वेला इंजिन नाही, आहे ती फक्त बोगी. भाजप कुठल्या डबल इंजिनची भाषा करीत आहे तेच कळत नाही, असे श्रीनिवास म्हणाले. राज्यातील बेरोजगार तरुण हे निराश बनले असून, भाजप सरकारने दर ठरवून नोकर्‍यांचा लिलाव केल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. भाजप रोजगार निर्माण करण्याच्याबाबतीत पूर्णपणे अपयशी ठरले आहे. देशात हरियाणानंतर बेरोजगारीच्याबाबतीत गोव्याचा दुसरा क्रमांक लागतो, असेही ते म्हणाले.
भाजप सरकार राज्यात महिलांना संरक्षण देण्याच्याबाबतीत अपयशी ठरले असून, भाजपने लैंगिक शोषण प्रकरणात हात असलेल्या एका नेत्याला अभय दिल्याचा आरोपही श्रीनिवास यांनी यावेळी केला.