गोव्यात खातेधारकांत खळबळ

0
127

>> रिझव्ह बँकेने येस बँकेवर निर्बंध लादल्याने गोव्यातील येस बँकेत गुंतवणूक केलेले ठेवीदार आणि बँक खातेधारकांमध्ये खळबळ माजली आहे.

येस बँकेच्या पणजी शहरातील शाखेत खातेदार आणि गुंतवणुकदारांनी काल गर्दी केली होती. तसेच राज्यातील इतर भागांतील शाखांतही ़खातेदारांनी गर्दी केली होती. गुंतवणूकदार व बँक खातेधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ग्राहकांनी बँकेच्या शाखांशी संपर्क साधून आरबीआयच्या निर्बंधाबाबत माहिती जाणून घेतली. ग्राहकांना खात्यातून ५० हजार रुपये काढण्यास मान्यता दिली आहे. खातेदारांना वैद्यकीय उपचार, विदेशी शिक्षण आणि लग्न या तीन कारणांसाठीच ५० हजारांपेक्षा जास्त रक्कम काढता येईल. जास्त रक्कम काढण्यासाठी मान्यता घ्यावी लागे. येस बँकेवर कर्जाचा बोजा चांगलाच वाढल्याने निर्बंध लादले आहेत. येस बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे.