गोव्यातील कोरोना रुग्णांची संख्या आली ३९ वर

0
157

राज्यात कोरोनाचे आणखी ९ रुग्ण बरे झाले असून त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या ३९ वर आली आहे, अशी माहिती आरोग्य खात्याने काल दिली.

राज्यातील कोरोना रुग्णांची आतापर्यंतची एकूण संख्या ६७ एवढी झाली आहे. त्यापैकी २८ कोरोना रुग्ण बरे झाले. त्यामुळे सध्या कोरोना रुग्णांची संख्या ३९ एवढी झाली आहे.

राज्यात सुरुवातीला कोरोना विषाणूची बाधा झालेले ७ रुग्ण बरे झाले. त्यानंतर ४० दिवस गोव्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नव्हता. परराज्यातील वाहने, प्रवाशांना प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर राज्यात कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. मागील आठवड्यात कोरोना विषाणू बाधीत १२ रुग्ण बरे झाले होते. आता, आणखी ९ कोरोना विषाणूची बाधा झालेल्या रुग्ण बरे झाले आहेत.

गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोरोना खास वॉर्डात कोरोना संशयित ६ रुग्णांना दाखल करण्यात आले असून कोरोना आयझोलेेशन वॉर्डात कोरोना संशयित १० जणांवर उपचार सुरू आहेत. गोमेकॉच्या कोविड प्रयोगशाळेत मागील २४ तास कोरोनाच्या ५३६ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून सर्व नमुने निगेटिव्ह आहेत. तर, २९ नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे.