गोव्यात येत्या 4 व 5 मे रोजी होणाऱ्या परराष्ट्रमंत्र्यांच्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) बैठकीला पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो झरदारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत पाकिस्तानचे शिष्टमंडळ सहभागी होणार आहे. परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो हे शिष्टमंडळाचे नेतृत्व करणार आहेत. एससीओ संघटनेत आठ सदस्य आहेत. या संघटनेचे अध्यक्षपद भारताकडे आहे. या देशांमध्ये भारत, रशिया, चीन, किर्गिझ प्रजासत्ताक, कझाकिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान आणि पाकिस्तान या देशांचा समावेश आहे. फेब्रुवारी 2019 मध्ये पुलवामातील दहशतवादी हल्ला आणि प्रत्युत्तरात भारताने केलेला बालाकोट एअरस्ट्राईक यानंतर दोन्ही देशांतील संबंध तणावाचे राहिले आहेत.