गोव्याचा पारा चढलेलाच!

0
55

दैनंदिन तापमान ३७ अंशांहून अधिक

कधी नव्हे तो गोव्यामध्ये मार्च महिन्यातच कडक उन्हाळा जाणवू लागला असून गेला आठवडाभर तर दैनंदिन तापमान ३७ अंशांच्याही पुढे गेल्याचे दिसून येत आहे. काल दिवसभरात कमाल तापमान ३७.३ अंश होेते व आजही ते कमाल ३७ अंश ते किमान २२ अंशदरम्यान राहील असा वेधशाळेचा अंदाज आहे. सध्या सरासरीपेक्षा तापमान पाच ते सात अंशांनी अधिक असल्याचे पणजी वेधशाळेचे म्हणणे आहे.

मंगळवारी गोव्याचे सरासरी तापमान ३८.७ अंशांवर जाऊन पोहोचले होते. त्यामुळे पाच मार्च हा गोव्यातील यंदाचा सर्वांत उष्ण दिवस ठरला. पूर्व व आग्नेयेकडून उष्ण वारे गोव्याकडे येऊ लागल्याने ही उष्णता जाणवत असल्याचे सांगण्यात येते.

दिवसा जरी उष्णतेचे चटके बसत असले तरी रात्री गारवा असतो असेही आढळून आले आहे. मार्चमध्येच जर ही स्थिती असेल तर येत्या एप्रिल – मे मध्ये काय स्थिती होईल या चिंतेने नागरिक ग्रस्त झाले आहेत.