‘गोवा सिमिक डेझ’ यात्रा आजपासून सुरू

0
14

राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्या राज्यातील प्राचीन व जुन्या वारसा वृक्षांशी संबंधित ‘गोवा सिमिक डेझ’ यात्रेला गुरुवार दि. 9 फेब्रुवारीपासून काणकोण तालुक्यातून प्रारंभ होणार आहे. यापूर्वी राज्यपाल पिल्लई यांनी राज्यात ‘गोवा ग्राम संपूर्ण यात्रा’ काढली होती. ही यात्रा गेल्या नोव्हेंबरमध्ये पूर्ण झाली होती. आता, गोवा सिमिक डेझ यात्रा काढण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. राजभवन प्रशासनाने या यात्रेसाठी राज्यातील विविध भागातील 31 जुन्या वारसा वृक्षांची यादी तयार केली आहे. राज्यपाल या सर्व वृक्षांना टप्प्याटप्प्याने भेट देणार आहेत. या यात्रेच्या कार्यक्रमांतर्गत राज्यपाल पैंगीण येथील पर्तगाळ मठाजवळील 2 हजार वर्षे जुन्या वटवृक्षाला भेट देणार आहेत. या वटवृक्षाची पूजा केली जाणार आहे. त्यानंतर राज्यपाल श्रीस्थळ काणकोण येथील जुन्या शिदाम वृक्षाला (जरमल वृक्ष) भेट देणार आहेत.