गोवा सरकारची कोळसा खाण देखरेख समिती स्थापन

0
144

गोवा सरकारने कोळसा खाण देखरेख समितीची स्थापना केली आहे. गोवा औद्योगिक विकास महामंडळाला मध्यप्रदेशात कोळसा खाण मंजूर झालेली आहे.

या खाणीवरील कामकाजावर या समितीकडून देखरेख ठेवली जाणार आहे. या समितीचे अध्यक्ष उद्योग मंत्री असतील. या समितीमध्ये गोवा राज्य उद्योग संघटनेचे दामोदर कोचर, जीसीसीआयचे अध्यक्ष मनोज काकुलो, गोवा औद्योगिक विकास महामंडळाचे जयवंत देसाई, पृती पाटकर यांचा समावेश आहे. या कोळसा खाणीसाठी ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. तसेच १९६ कोटी रुपये कायम ठेवीच्या स्वरूपात भरावे लागणार आहेत.