गोवा माईल्स बूक केल्यामुळे टॅक्सीचालकांकडून छळ

0
8

गोवा माईल्स ही ॲपधारित टॅक्सी बूक केल्यानंतर काणकोण पाटणे येथे स्थानिक टॅक्सीवाल्यांनी आपला छळ केल्याचा आरोप जर्मन ट्रॅव्हल्स इन्फुएन्सर ॲलेक्स वेल्डर यांनी केला आहे. एका स्थानिक रिक्षा चालकाने आपल्याकडे भाड्यापोटी 500 रुपयांची मागणी केली. तर या उलट ॲपधारीत टॅक्सीने त्यासाठी 300 रुपये आकारल्याचे वेल्डर यांनी समाजमाध्यमावर टाकलेल्या पोस्टद्वारे स्पष्ट केले आहे.
ॲपधारीत टॅक्सी बूक केल्याच्या प्रश्नावरून पर्यटकांचा छळ करण्याच्या घटना राज्यात अधूनमधून सुरू असून यामुळे गोव्याचे नाव बदनाम होत आहे. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.