गोवा महिलांसाठी सर्वाधिक सुरक्षित

0
293

भारतात महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गोवा हे सर्वांत सुरक्षित राज्य असल्याचे ‘प्लान इंडिया’द्वारे तयार करण्यात आलेल्या अहवालात म्हटले आहे. देशाची राजधानी दिल्लीसह उत्तर प्रदेश, झारखंड, बिहार ही राज्ये महिलांसाठी सर्वाधिक असुरक्षित असल्याचे अहवालात म्हटले आहे. केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयाने हा अहवाल काल प्रसिद्ध केला.

महिलांच्या सुरक्षेत गोवा अव्वल असला तरी शिक्षण आणि आरोग्याच्या बाबतीत पाचव्या तर गरिबीत आठव्या स्थानावर असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. महिला सुरक्षेच्या बाबतीत गोव्यापाठोपाठ केरळ, मिझोराम, सिक्कीम, मणिपूर या राज्यांचा क्रमांक लागतो. महाराष्ट्र नवव्या क्रमांकावर तर गुजरात १६ व्या स्थानी आहे.
महिला सुरक्षेच्या बाबतीत देशातील राज्यांना शून्य ते एक असे गुण देण्यात आले. यामध्ये गोव्याला सर्वांत जास्त ०.६५६ तर बिहारला सर्वांत कमी ०.४१० गुण मिळाले. देशभरातील राज्यांच्या कामगिरीची सरासरी काढल्यास ती ०.५३१ इतकी होते.