गोवा फॉरवर्डची पहिली यादी जाहीर

0
47

आगामी गोवा विधानसभा निवडणुकीसाठी गोवा फॉरवर्डने आपल्या उमेदवारांच्या नावाची पहिली यादी जाहीर केली आहे. फातोर्डा मतदारसंघातून पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांना, तर मये मतदारसंघातून संतोषकुमार सावंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे, अशी माहिती पक्षाचे सरचिटणीस मोहनदास लोलयेकर यांनी काल दिली.

कॉंग्रेस व गोवा फॉरवर्डमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसाठी युती झाली आहे. रविवारीच कॉंग्रेसने फातोर्डा व मये मतदारसंघ गोवा फॉरवर्डला सोडल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर लगेचच गोवा फॉरवर्डने या मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली आहे. आता ज्या दोन मतदारसंघांतील उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत, ती पक्षाची पहिली यादी आहे, असे लोलयेकर यांनी स्पष्ट केले.