गोवा पोलिसांकडून द्रोनची मदत वरद करमलीने केले हवाई सर्वेक्षण

0
133

 

सध्या सुरू असलेल्या संपूर्ण संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर गोवा पोलिसांनी द्रोनची मदत घ्यायला सुरवात केली आहे. कुडचडे येथील हौशी द्रोन छायाचित्रकार वरद मारूती करमली यांनी काल मडगाव येथील हाऊसिंग बोर्ड कॉलनीचे हवाई सर्वेक्षण केले.

या परिसराचा नकाशा पोलिसांकडे नव्हता. दोन फुटेजच्या मदतीने आता पोलिसांनी परिसराचा नकाशा बनवला असून त्याप्रमाणे बंदोबस्त ठेवला आहे. खारेबांद, शिरफोडे परिसराचा हवाई सर्वेही करमली यांनी केला आहे. त्याचीही मदत पोलिसांना होत आहे. वरदचे वडील व प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते मारूती करमली यांनीही त्याला या कामी साह्य केले.