गोवा नागरी सेवेतील नऊवरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या

0
6

राज्य सरकारने गोवा नागरी सेवेतील 9 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदलीचा आदेश काल जारी केला आहे.
देविदास गावकर यांची गोवा राज्य माहिती आयोगाच्या सचिवपदी, प्रशांत शिरोडकर यांची गोवा कोकणी अकादमीच्या सचिवपदी, सोहन उस्कईकर याची गोवा औद्योगिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी, मंगलदास गावकर यांची प्रकल्प अधिकारी डिआरडीए-उत्तर, हरिष अडकोणकर यांची गोवा राज्य पायाभूत साधनसुविधा विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी, रोहित कदम यांची गोवा पुनर्वसन मंडळाच्या सचिवपदी, दामोदर मोरजकर यांची अतिरिक्त सचिव (प्रॉटोकॉल), पराग नगर्सेकर यांची गोवा राज्य मागासवर्गीय आयोगाच्या सदस्य सचिवपदी आणि दिनेश पवार यांची गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या संचालकपदी( प्रशासन) नियुक्ती करण्यात आली आहे.