गोवा-दिल्ली विमानात कर्मचाऱ्याशी गैरवर्तन

0
4

एअर इंडियाच्या विमानात क्रू मेंबरसोबत गैरवर्तन केल्याची आणखी एक घटना सोमवारी घडली. त्यात एका प्रवाशाने क्रू मेंबरला मारहाण करत अर्वाच्य शिवीगाळ केली. 29 मे रोजी फ्लाइट क्रमांक एआय 882 गोव्याहून नवी दिल्लीला येत होती. त्यातील एका प्रवाशाने अचानक क्रू मेंबरसोबत गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता त्याने हाणामारी सुरू केली. दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतरही हा प्रवासी गैरवर्तन करत होता. त्यामुळे त्याला सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या ताब्यात दिले, अशी माहिती एअर इंडियाच्या प्रवक्त्याने दिली.